
Bhiwandi: कंपनीच्या मालाच्या अपहारप्रकरणी कोणावर गुन्हा दाखल?

शारिफ अंसारी
भिवंडी : (bhiwandi) त्वाम इंटरप्रायझेस कंपनीत काम करणारा सेल्समन कंपनीच्या मालाचा परस्पर अपहार करून विक्री केलेल्या मालाची रक्कम स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ठेवत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सेल्समनच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात(Narpoli police station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहमद असिफ मुसा शेख (३२ रा.नालासोपारा) असे गुन्हा दाखल झालेल्या सेल्समनचे(salesman) नाव आहे. त्याने दापोडा येथील कंपनीत डिसेंबर २०१९ ते मार्च २०२१ पर्यंत काम करीत असताना कंपनीतील ३ लाख ९२ हजार १७१ रुपये किंमतीच्या बुटांच्या मालाची डिलेव्हरी(delivering) दुकानदारांना करून त्यांच्याकडून मिळालेल्या रक्कमेचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी हेतूपुरस्सर अपहार केला आहे. सदर बाब कंपनीतील मॅनेजर विलास ओमप्रकाश मिश्रा (३४) याच्या लक्षात येताच त्याने मोहमद याच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि. बढे करीत आहेत.