
Bhiwandi: धूम स्टाईलने महिलेच्या मंगळसूत्र व गंठणीची चोरी

शारीफ अन्सारी
भिवंडी: (Bhiwandi) ऑटो रिक्षातून पती व पुतण्यांसह हळदीसाठी कल्याण-खडकपाडा(Kalyan-Khadakpada) येथे जात असताना रिक्षा काल्हेर येथून मानकोली नाका मार्गे ठाण्याच्या दिशेला जात असताना पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञाताने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व गंठण हिसकावून चोरी करून पलायन केल्याची घटना डोंगराळी फाटा येथे गुरुवारी रात्री घडली आहे. या चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेखा तानाजी पतंगराव (48 रा.काल्हेर) ह्या पती व पुतण्यांसह कल्याण-खडकपाडा येथील नातेवाईकांच्या हळदीला जाण्यासाठी ऑटो रिक्षातून निघाल्या होत्या त्यावेळी रिक्षा डोंगराळी फाट्यावर आली असता पाठीमागून ड्युक मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १ लाख ३ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर जोरात हिसका मारून मंगळसूत्र व गंठणीचा अर्धा भाग चोरून भरधाव वेगाने पलायन केले आहे. पुढील तपास पोऊनि गिरासे करत आहेत.