
Bhiwandi : महापालिकेच्यावतीने स्वच्छतेविषयी जनजागृती

शारिफ अंसारी:
भिवंडी (Maharashtra News) [India]: (Bhiwandi) भिवंडी महापालिकेच्यावतीने आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत शहरात ठिकठिकाणी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. प्रभाग समिती चार अंतर्गत असलेल्या वार्ड क्रमांक-२० मध्ये नारपोली चौकात(Narpoli Chowk) पालिकेच्यावतीने ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण याबाबत तसेच प्लास्टिक बंदी कोव्हिड-१९ लसीकरण आदी विषयांवर जनजागृती करण्यात आली.
यावेळी उपस्थित कर्मचारी व नागरिकांनी माझी वसुंधराबाबत शपथ घेतली. या कार्यक्रमाप्रसंगी आरोग्य अधिकारी अशोक संखे, डॉ. धर्मेंद्र पटेल, प्रभाग आरोग्य निरीक्षक हरीश भंडारे, समाधान जाधव, सिद्धार्थ सोनवणे, संदीप घाडगे, सनी साळवे, निलेश सोनवणे, प्रल्हाद मानकर तसेच मुकादम राजेंद्र निषाद, देवेंद्र चाचड, मारुती जाधव व कर्मचारी उपस्थित होते. तर प्रभाग समिती पाच मध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक(Chhatrapati Shivaji Maharaj Chowk) या ठिकाणी देखील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायकल रॅलीद्वारे जनजागृती मोहीम राबिवण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी प. रा. विद्यालयाचे शिक्षक अनिल शहाकर, प्रभाग अधिकारी सुनील भोईर, आरोग्य अधिकारी ए. एन. संखे, पर्यावरण प्रमुख नितीन चौधरी, प्रभाग आरोग्य अधिकारी शशिकांत पी. घाडगे, आरोग्य निरीक्षक उत्तम जाधव, रुपेश गायकवाड, निलेश शेलार, हरेश गायकवाड, सुमित कांबळे तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.