
Bangalore : हवाईदल प्रमुख यांनी भारतीय बनावटीच्या लढावू विमानातून केले उड्डाण

Indiagroundreport वार्ताहर
बंगळुरू : हवाईदल प्रमुख एअरमार्शल वी. आर. चौधरी(V. R. Chaudhary) यांनी भारतीय बनावटीच्या तीन लढावू विमानांतून स्वत: विमान चालवित उड्डाण केले. ते दोन दिवसांच्या बंगळुरू दौऱ्यावर आहेत. हलक्या वजनाचे काँबॅट लढावू विमान(LCA) तेजस, लाईट काँबॅट हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर आणि हिंदुस्तान ट्रेनर-40 ही देशी बनावटीची विमाने, आत्मनिर्भर भारत मोहिमेचा भाग म्हणून आता भारतीय हवाईदलात समाविष्ट करण्यात आली आहेत.
यावेळी हवाईदल प्रमुखांना एलसीच LCH आणि HTT-40 या विमानांच्या क्षमता, तसेच तेजसच्या अद्ययावततेविषयी माहिती देण्यात आली. त्यांनी या क्षेत्रातील सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना जाणून घेण्यासाठी विमानांचे रचनाकार, चाचणी करणाऱ्या चमूसोबतही चर्चा केली.
6 ऑगस्ट 2022 रोजी हवाईदल प्रमुखांनी एअर चीफ मार्शल एल. एम. खत्री स्मृती व्याख्यानमालेत आपले विचार मांडले. हवाईदलाचे अनेक कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचारी-अधिकारी, एचएएलचे कर्मचारी आणि विमान उद्योगातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
सीएएस यांनी यावेळी ‘भारतीय हवाईदलाच्या क्षमता आणि दलाच्या विकासाच्या योजना’ यावर बोलताना हवाईदलाच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली.