India Ground Report

kalyan : कल्याणमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; २ नागरिकांसह तीन जनावरांवर हल्ला

kalyan : Leopard's roar in Kalyan; Attack on three animals including 2 civilians

Indiagroundreport वार्ताहर
कल्याण : (kalyan)
कल्याणमध्ये(Kalyan) बिबट्या शिरल्याने एकच गोंधळ उडाला. कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा भागात एका इमारतीत बिबट्या शिरल्याने नागरिकांचां एकच गोंधळ उडाला. चिंचपाडा रोडवरील श्रीराम अनुग्रह टॉवर नावाच्या इमारतीत आज पहाटे अचानक बिबट्या शिरला. बिबट्याने आतापर्यंत दोन नागरिक आणि तीन प्राण्यांवर हल्ला केला आहे. या बिबट्याला पकडण्याठी वनविभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल(viral) होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे भक्ष्याच्या शोधात हा बिबट्या(leopard) कल्याण पूर्वेत आला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्थानिकांनी याची माहिती वनविभागाला(forest department) दिली आणि सर्व सूत्र तातडीने फिरली.

नागरिकांच्या आरडा-ओरड्यामुळे श्रीराम अनुग्रह या सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावरील पॅसेजमध्ये बिबट्याला अडकवून ठेवण्यात आले. मात्र, दोन नागरिकांना या बिबट्याने जखमी केले असून, तीन जनावरांवरदेखील हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

इमारतीमधील तीन लोकांवर हल्ला करून मग हा बिबट्या इमारतीत शिरला. इमारतीमधील नागरिकांना रेस्क्यू करीत बाहेर काढण्यात आले असून, इमारत रिकामी केली असल्याची माहिती वनविभागाचे अधिकारी आर. चन्ने यांनी दिली.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी(Kolsevadi) हा परिसर तसा दाट लोकवस्तीचा आहे. मात्र, शेजारीच हाजीमलंगचा विस्तीर्ण घनदाट जंगलाचा डोंगर भाग आहे. या भागातून हा बिबट्या आला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version