
Kalyan : फेरीवाला महिलांच्या खुलाश्यानंतर पैसे उकळल्याच्या आरोप प्रकरणास वेगळे वळण

‘कुणाल पाटील यांच्या समर्थकांनी आमच्याकडून कधीही पैसे मागितले नाही‘
सचिन सागरे:
कल्याण (Maharashtra News) [India]: (Kalyan) फेरीवाल्याकडून पैसे उकळल्याच्या प्रकरणास वेगळे वळण लागल्याचे दिसत आहे. आमच्याकडून कुणाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी स्टॉल(stalls) लावण्याच्या बदल्यात कधीही पैसे मागितले नाही. त्यांच्याविषयी करण्यात आलेला आरोप खोटा आहे, असा दावा फेरीवाला महिलांनी रविवारी केला.
कल्याण (पूर्व) भागातील आडीवली परिसरात एक व्हिडीओ सोशल मीडियावर(social media) व्हायरल झाला. या प्रकरणात फेरीवाल्याकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप केला गेला. एका महिलेने तिच्याकडून काही लोक स्टॉल लावण्याच्या बदल्यात जबरदस्तीने पैसे मागत आहेत, असा आरोप करीत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने मानपाडा पोलिसांनी माजी नगरसेवकासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणास आत्ता नवे वळण लागले आहे. फेरीवाल्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप केला गेला. आडीवली परिसरातील अनेक फेरीवाल्या महिल्यांनी पुढे येत असा खुलासा केला आहे की, कुणाल पाटील यांच्या समर्थकांनी(Kunal Patil’s supporters) कधीही फेरीवाल्यांकडून पैसे घेतले नाही. हा राजकीय षडयंत्र आहे. कुणाल पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
फेरीवाल्यांच्या या खुलाशानंतर एकच खळबळ उडाली आहे. फेरीवाल्यांनी या संदर्भात काही महिन्यापूर्वी एक अर्ज दिला होता. त्या अर्जात त्यांनी काही लोकांकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलिसांनी त्या अर्जाचा तपास न करता कुणाल पाटील यांच्या विरोधात विनाकारण खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्या अर्जाची पोलिसांनी दखल घेतली पाहिजे, अशी मागणी फेरीवाल्या महिलांनी(The women peddlers) केली आहे.