
Indiagroundreport वार्ताहर
जकार्ता : (Jakarta) इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे सोमवारी भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणविले. आजच्या भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
हवामान आणि भूभौतिकीय एजन्सीनुसार, आजच्या भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावामधील सियांजूर येथे जमिनीच्या 10 किमी खोलीवर होता. एएफपीच्या वृत्तानुसार, या भूकंपात जावामध्ये(Java) सुमारे 44 लोकांचा मृत्यू झाला असून, 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.