
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai) आपल्या जीवनावर कोणीही बायोपिक बनवू नये, अशी इच्छा मिथुन चक्रवर्ती यांनी व्यक्त केली. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमात बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते तथा राज्यसभेचे खासदार मिथुन चक्रवर्ती(Mithun Chakraborty) यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांच्या आयुष्यावरील काही खास आठवणींना उजाळा देण्यात आला. नंतर त्यांना त्यांच्या बायोपिकबद्दलही विचारण्यात आले होते. तेव्हा त्यांनी बायोपिकसाठी स्पष्ट नकार दर्शविला.
मिथुन चक्रवर्ती यांनी भारतात नृत्यातही अमूलाग्र बदल घडवून आणले. त्यांच्या अभिनयाने आणि खास डान्स शैलीने त्यांचे चाहते त्यांच्यावर आजही दिलखुलास प्रेम करीत आहेत. बॉलिवूडमधील(Bollywood) ८०-९० च्या दशकातील काळ यांनी आपल्या अभिनयाने गाजविला होता. अनेक लोकं आजही त्यांच्या अभिनयाची आणि त्यांच्या चित्रपटांची खिल्ली उडवितात, पण त्याच चित्रपटांमुळे ते आज बॉलिवूड क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवून उभे आहेत. सोबतच मिथुन यांचे बॉलिवूडमध्ये टिकण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची जिद्द आणि कामातील मेहनत.
मिथुन चक्रवर्ती यांचे भारतीय चित्रपट उद्योगाकरिता अतुलनीय योगदान(contribution) आहे. आत्तापर्यंत अनेक कलाकारांचे बायोपिक बनविण्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर हे घडणे निश्चितच आहे. सध्या बॉलिवूडमध्ये त्यांच्या बायोपिकची चर्चा होत आहे. मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या जीवनावर आधारित कोणताही चित्रपट बनवायचा नाही. याचे कारण त्यांनी स्वत: स्पष्ट केले आहे.
शोमध्ये बोलताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, प्रत्येकाने संघर्षाचे दिवस पाहिले आहेत, पण माझ्या त्वचेच्या रंगामुळे मला अपमानित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बऱ्याच वर्षांपासून माझ्या त्वचेमुळे(skin) माझा अपमान करण्यात आला. रिकाम्या पोटी झोपायचो, असे बरेच दिवस मी पाहिले आहेत. असे काही दिवस होते जेव्हा पुढचे जेवण काय? आणि कुठे झोपायचे? हे माहीत नव्हते.
मिथुन चक्रवर्ती पुढे म्हणाले की, अनेकवेळा मी फूटपाथवर झोपलो होतो.
त्यामुळेच मिथुन चक्रवर्ती यांना त्यांचा बायोपिक बनवायचा नाही किंवा त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवायचा नाही. कारण ते म्हणतात की, यामुळे कोणाला प्रेरणा मिळणार नाही, पण मानसिकदृष्ट्या समोरचा व्यक्ती खचून जाईल. सोबतच ते पुढे म्हणतात की, प्रत्येकाने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करावेत, जर मी स्वप्न(dream) जगत पूर्ण करु शकतो, तर तुम्हीही नक्कीच स्वप्न पूर्ण करू शकता.