India Ground Report

Entertainment : ‘बेबी ऑन बोर्ड’चे एपिसोड्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित

Entertainment : Episodes of 'Baby on Board' released on Planet Marathi OTT

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai)
‘बेबी ऑन बोर्ड'(‘Baby On Board’)चे पुढील एपिसोड्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. यात प्रतीक्षा मुणगेकर आणि अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘बेबी ऑन बोर्ड’च्या पहिल्या दोन एपिसोड्सला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आता पुढे श्रुती आणि सिद्धार्थच्या जर्नीमध्ये काय होणार, हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. श्रुती आणि सिद्धार्थच्या आतापर्यंतच्या प्रवासात श्रुतीचे डोहाळे, प्रेग्नंसी डाएटची काळजी घेणारा सिद्धार्थ सर्वांनी पाहिला. या पुढच्या प्रवासात श्रुतीची डॅाक्टर व्हिजिट, सोनोग्राफी, सिद्धार्थची बाळ बघण्याची उत्सुकता, एक बेस्ट डॅडी बनण्यासाठीची धडपड यात पाहायला मिळत असून, याव्यतिरिक्त दोघांच्या आई-बाबांच्या ‘सरप्राईज व्हिजिट’ने यात अधिकच रंगत आणली आहे.

प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर(Akshay Bardapurkar) म्हणतात की, ‘बेबी ऑन बोर्ड’चे पहिले दोन एपिसोड्स प्रदर्शित होऊन प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे, याचा ‘बेबी ऑन बोर्ड’च्या संपूर्ण टीमला आनंद आहे. ‘मॅाम टू बी’ आणि ‘डॅड टू बी’ची धमाल जर्नी यात आहे, त्यामुळे ही गोष्ट कुठेतरी आपल्या जवळची वाटणारी आहे. पुढच्या सर्व एपिसोड्सला तसेच ‘बेबी ऑन बोर्ड’ सिरीजला असाच उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे. प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, फिल्मी आऊल स्टुडिओज प्रस्तुत ‘बेबी ऑन बोर्ड’ या सिरीजचे दिग्दर्शन सागर केसरकर यांनी केले आहे. निर्माते साईनाथ राजाध्यक्ष व बिना राजाध्यक्ष असून, अंकित शिंदे व दिव्या घाग हे कार्यकारी निर्माते आहेत.

Exit mobile version