India Ground Report

Dhule : अपहरण झालेल्‍या ‘त्या’ तरुणाची पोलिसांनी केली सुटका

Indiagroundreport वार्ताहर
धुळे : अपहरण करून पळविलेल्या तरुणाची सुटका करण्यात आली आहे, यानंतर धुळे(Dhule) तालुका पोलिसांनी तिघा अपहरणकर्त्यांचा शोध घेत त्यांना ताब्‍यात घेतले आहे.

राजस्थान(Rajasthan) येथील 21 वर्षीय तरुणास मध्य प्रदेश येथील तिघा जणांनी काही कारणास्तव अपहरण करून नेले होते. यासंदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदविण्यात आलेली होती. तक्रारीच्या अनुषंगाने धुळे तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करीत तिघा अपहरणकर्त्यांच्या धुळे तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

मध्य प्रदेश(Madhya Pradesh) येथील मुरेना ग्वाल्हेर या ठिकाणी या तिघाही अपहरणकर्त्यांनी या तरुणास जबरीने वाहनात कोंबून नेले होते. तालुका पोलिसांनी अचूक लोकेशन ट्रेस करीत या तिघाही अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या तिघाही आरोपींना न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत.

Exit mobile version