India Ground Report

Dhule : धुळे मनपाला 60 कोटींचा निधी मंजूर

Indiagroundreport वार्ताहर
धुळे : धुळे मनपा हद्दीत अनेक वर्षांपासून विकासकामे रखडलेली आहेत. निधीअभावी ही कामे होत नव्‍हती. परंतु, रखडलेल्‍या विकास कामांसाठी धुळे मनपाला तब्‍बल ६० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे विकासकामे आता मार्गी लागणार आहेत.

धुळे महापालिका(Dhule Corporation) हद्दीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून निधीअभावी विकासकामे रखडून पडलेली होती. याचा परिणाम नागरिकांच्या रोषाला महानगरपालिका प्रशासन त्याचबरोबर लोकप्रतिनिधींना देखील सामोरे जावे लागत होते, परंतु आता धुळे महापालिका हद्दीमधील 41 विकासकामांसाठी जवळपास 60 कोटी रुपयांचा निधी प्रशासनातर्फे मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता धुळे महानगरपालिका हद्दीतील रखडलेल्या विकासकामांना गती मिळणार आहे.

धुळे शहरातील रस्त्यांची(roads) गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. तसेच, शहरातून भूमीअंतर्गत गटारीचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, शहरातील सुशोभीकरण करण्यासाठी देखील हा निधी वापरण्यात येणार असल्यामुळे धुळे महापालिका हद्दीतील बहुतांश समस्या पालिका प्रशासनाला दूर करता येणार आहेत.

Exit mobile version