India Ground Report

Beed : महावितरणच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी अडविला पाटोदा-लातूर महामार्ग

Beed: Farmers blocked Patoda-Latur highway in protest of Mahavitaran

Indiagroundreport वार्ताहर
बीड : (Beed)
कोणतीही कल्पना, नोटीस न देता महावितरणकडून बीड जिल्ह्यात कृषी पंपाचे वीजकनेक्शन ताेडण्याचा धडाका सुरू आहे. या विरोधात आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. बीडच्या(Beed) लिंबागणेश येथे पाटोदा-लातूर महामार्ग अडवत सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले.

बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत खरिपातील सोयाबीन, कापूस आदी पिके हातची गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे ऐन रब्बी हंगामात ज्वारी, गहु, हरबरा पिकांना पाणी(water) देण्याची आवश्यकता असतानाच महावितरणकडून थकीत वीजबील वसुलीच्या नावाखाली कृषिपंपाचे वीजकनेक्शन तोडण्यात येत आहे.

अगोदरचं अस्मानी संकटात असताना आता महावितरणने(Mahavitaran) संकट निर्माण केले आहे, त्यामुळे शेतक-यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणच्या धोरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश येथे पंचक्रोशीतील शेतक-यांनी पाटोदा-लातूर राष्ट्रीय महामार्ग अडवत चक्काजाम आंदोलन केले.

दरम्यान, शेतकऱ्यांचे(farmers) तोडलेले कनेक्शन परत जोडा आणि यानंतर कृषी पंपाचे वीजकनेक्शन तोडू नयेत, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Exit mobile version